एकता कपूरनं भाजप मंत्री स्मृती इराणींसाठी लिहिली ‘इमोशनल’ पोस्ट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एकता कपूर आणि भाजपच्या महिला व बालविकास आणि टेक्सटाईल मंत्री तसेच एक अ‍ॅक्ट्रेस स्मृती इराणी यांची फ्रेंडशिप साऱ्यांनाच माहिती आहे. स्मृती इराणी एकता कपूरचा मुलगा रवी कपूरसोबतही दिसत असतात. एकता कपूरनं स्मृती इराणींसाठी एक इमोशनल नोट लिहिली आहे.

एकता कपूरनं आपल्या नोटमध्ये लिहिलं की, “या महिलेनं माझ्यासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि माझी चांगली मैत्रीण झाली. यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं. त्या कला, राजकारण, व्यवसाय, सिनेमे अशा सर्वच गोष्टीत माहिर आहे. त्यांच्यात पॅरेंटींगचीही कला आहे. अनके भूमिकांना बॅलन्स करणाऱ्या त्या मल्टीस्टारर आहेत. त्या मला चांगलं बनवू इच्छित आहे. मी रोज आमची फ्रेंडशिप साजरी करत असते. #soulsister स्मृती इराणी.”

पुढे एकतानं लिहिलं की, “महिला कशा असतात. त्यांची देखरेख कशी केली जावी. मी फक्त एवढंच म्हणून इच्छिते, मजबूत व्हा. मजा करा. Be You. आपल्या भाग्याची व्याख्या आपणच तयार करा. इतरांना करू देऊ नका.” राजकारणात येण्याआधी स्मृती इराणी यांनी टीव्हीत खूप नाव कमावलं आहे. त्यांनी एकता कपूरचा आयकॉनिक टीव्ही शो क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेत तुलसी ही भूमिका साकारली होती. आजही त्यांचं या भूमिकेसाठी स्मरण केलं जातं. हा शो 8 वर्षे चालला होता.