चर्चित ३ मिनिटांचा ‘किसिंग’ सीन ; शुट करायला लागले ३ दिवस !

मुंबई : वृत्तसंस्था – एकता कपूरला टीव्ही इंडस्ट्रीतील क्विन म्हटलं जातं. तिने अनेक मोठ्या मालिकांची निर्मिती केली आहे. तिच्या शोजमधील अनेक सीन चर्चेत आले आहेत. एकता कपूरने इंस्टाग्रामवर असाच एक वादग्रस्त सीन शेअर केला आहे. एकताने जो सीन शेअर केला आहे तो प्राची देसाई आणि रामकपूर यांच्यातील कसम से या मालिकेतील किसिंग सीन आहे. या शोमध्ये प्राची देसाईने बानी कपूरचा आणि राम कपूरने मिस्टर वालियाचा रोल केला होता.

एकता कपूरने कसम से या मालिकेतील हा सीन शेअर करत लिहिले की, “या ३ मिनिटांच्या सीनला शुट करण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी लागला होता. बानीने मिस्टर वालियाला किस करण्यासाटी नकार दिला होता. अशावेळी १७ वर्षांच्या बानीला ॲम्बेरेस होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही लाईट्स आणि शॅडोचा वापर केला. हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात जास्त चर्चित सीन राहिला आहे. ज्यांनी कोणी मिस्टर वालिया आणि बानीचा रोमान्स मिस केला ते पाहू शकतात.”

कसम से या मालिकेला पुन्हा एकदा नवीन कास्ट घेऊन बनवण्याचीही प्लॅनिंग होत आहे. प्रेक्षकही ही मालिका दुसऱ्यांदा पाहण्यासाठी प्रतिक्षा करताना दिसत आहेत. एकता कपूरने कसौटी जिंदगी या मालिकेला रिबूट करत कसौटी जिंदगी की २ रिलीज केली. या शोला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच अशी अपेक्षा आहे की, येणाऱ्या काही दिवसांत बालाजी टेलिफिल्म्सच्या जुन्या शोचे रिबूट पहायला मिळतील.

 

आरोग्यविषयक वृत्त –

‘किवी’ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

शांत झोपेसाठी रात्री करा ही ‘आसने

‘बीफ’ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय