नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता बँकेत तुम्ही नवे खाते सुरु करताना येणारी वेरिफिकेशनची प्रक्रिया डिजिटल केवायसीच्या माध्यमातून होणार आहे. ही प्रक्रिया ग्राहकांसाठी अधिक सोपी आणि सुरक्षित होईल. यासंबंधित UIDAI चे CEO अजय भूषण पांडे यांनी माहिती दिली.
ते म्हणाले की, मोबाइल कनेक्शन देण्यासाठी डिजिटल केवायसी टेलिकॉम क्षेत्रात यशस्वी आहे. बँक खाते देखील कोणाकडे आधार, मतदान ओळखपत्र, ड्रायविंग लायसनेस आहे ते टेलिकॉम सेक्टर सारखेच डिजिटल केवायसी पर्यायाचा वापर करु शकतात. ते म्हणाले की, डिजिटल केवायसीसाठी जी प्रक्रिया वापरली जाईल, ती अत्यंत सोपी, सुरक्षित आणि फसवणूक मुक्त होईल.
अजय पांडे म्हणाले की, डिजिटल केवायसीने त्या लोकांना सोपी होईल जे बँकेत खाते सुरु करताना आधार क्रमांक देऊ इच्छित नाहीत. सरकारने मागील आठवड्यात मनी लॉन्ड्रिंग विरोधी नियमांचे संशोधनची सूचना दिली होती, यात बँक खाते सुरु करण्यासाठी आधार ऐच्छिक करण्यात उपयोगाची अनुमती देण्यात यावी. याशिवाय वाहन परवाना आणि मतदान ओळख पत्राच्या माध्यमातून वेरिफाय करण्याची प्रक्रिया डिजिटल केवायसीसाठी विस्तृत प्रक्रियेचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
नोटिफिकेशनमुळे वेरिफिकेशनच्या विविध प्रणालींचा उपयोग करण्याचा मार्ग सोपा करण्यात आला आहे. यात आधार eKYC, ऑफलाइन वेरिफिकेशन आणि डिजिटल केवायसीचा समावेश करण्यात आला आहे. हीच प्रक्रिया म्युचूअल फंडमध्ये गुंतवणूक आणि डिमॅट खाते सुरु करण्यासाठी वापरण्यात येईल. KYC च्या माध्यमातून निश्चित केले जाते की बँकिंग सेवेचा दुरुपयोग होत नाही.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा