El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती, धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू

स्पेन : वृत्तसंस्था – El-Colacho Festival | मुल जन्माला आल्यानंतर स्पेन (Spain) मध्ये एक विचित्र परंपरा साजरी केली जाते. येथे एल कोलाचो नावाचा एक फेस्टिव्हल (El Colacho Festival) साजरा केला जातो. यास बेबी जंपिंग किंवा डेव्हिल जंपिंग फेस्टिव्हल (Baby jumping or Devil jumping festival) सुद्धा म्हटले जाते.

जवळपास 400 वर्षे जुन्या या परंपरेनुसार नुकत्याच जन्मलेल्या मुलाला त्याची आई रस्त्यावर अंथरलेल्या बिछान्यावर झोपवते. यानंतर लोक या मुलांवरून उड्या मारतात. या लोकांनी विशेष प्रकारचा लाल आणि पिवळा ड्रेस घातलेला असतो, यापैकी एका व्यक्तीला डेव्हिल (Devil) मानले जाते, जो मुलांवर उडी मारतो. असे तोपर्यंत होते जोपर्यंत डेव्हिल सर्व मुलांवरून उडी मारून निघून जात नाही.

असे का केले जाते?
हैराण करणारी बाब म्हणजे ही प्रथा येथील लोक मोठ्या उत्साहाने साजरी करतात. या परंपरेबाबत अशी समजूत आहे की डेव्हिल जेव्हा मुलाच्या वरून जातो तेव्हा मुलाची सर्व पाप नष्ट करतो किंवा स्वता खेचून घेतो आणि भविष्यात त्यांना वाईट कामापासून दूर ठेवतो.

याची सुरूवात कधी झाली?
या परंपारिक स्पॅनिश फेस्टिव्हलची सुरुवात 1600 मध्ये झाली होती. हा उत्सव बर्गोस प्रांतात सासामोन (Sasamon in Burgos) चे एक गाव कॅस्ट्रिलो डी मर्सिया (Small town of Castrillo de Murcia of Spain) मध्ये कॉर्पस क्रिस्टीच्या कॅथेलिक जल्लोष साजरा करण्यासाठी (Catholic celebrations for Corpus Christi) दरवर्षी होतो. मात्र, अनेक लोक यास अंधश्रद्धा म्हणतात, अनेक लोक असेही म्हणतात यामुळे मुलांना दुखापत सुद्धा होऊ शकते.

Web Titel :- el-colacho-festival | baby jumping festival in spain signify baptism which will free them from sins anjsh

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या