मुलींच्या झोपण्याच्या पद्धतीवरून जाणून घ्या कशी मुले असतात त्यांची पहिली ‘पसंत’

पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही कधी ऐकले आहे का की एखाद्या व्यक्तीच्या झोपण्याच्या पद्धतीवरून त्याचा स्वभाव जाणून घेता येऊ शकतो. जी व्यक्ती सरळ झोपते ती नियमांचे पालन करणारी असते. याशिवाय ज्या व्यक्ती पाय क्रॉस करून झोपतात त्या खुपच मनमौजी असतात. अशाच प्रकारे तुम्ही मुलींच्या झोपण्याच्या पद्धतीवरून सुद्धा त्यांचा स्वभाव जाणून घेऊ शकता. मुली ज्या पद्धतीने झोपतात, ती पद्धत सांगते की, तिला कशाप्रकारची मुले आवडतात. मुलींचे झोपण्याचे प्रकार आणि त्यांची पसंती जाणून घेवूयात…

सरळ झोपणारी
ज्या मुली पाय न दुमडता आपले हात सरळ ठेवून, ताट झोपतात त्या बहुतेक संतुलित स्वाभावाच्या असतात. अशा मुली जीवनात काही मिळवण्याची इच्छा ठेवतात. मोठी स्वप्न पाहतात आणि डोमिनेटिंग मुले त्यांना आवडतात.

बिछाण्यावर उपडे पडून पाय पसरवून झोपणारी
अशा झोपणार्‍या मुली खुपच बेपर्वा वृत्तीच्या असतात. अशा मुली प्रत्येक वेळी काही ना काही डिमांड करत असतात. त्यांना सरप्राइज देणारी मुले खुप आवडतात. जी मुले स्वभावाने बोरिंग असतात, अशा मुली त्यांच्यापासून दूर राहतात.

डाव्या कुशीवर झोपणारी
डाव्या कुशीवर झोपणे, ही झोपण्याची सर्वात चांगली मुद्रा मानली जाते. या मुद्रेत झोपल्याने स्वप्न सुद्धा चांगली पडतात. अशा मुली जीवनात मोठे बदल पसंत करत नाहीत. त्या बोलण्यात खुप तरबेज असतात, त्यांना नेतृत्व करणारी मुले पसंत असतात.

उशीवर हात ठेवून झोपणारी
डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपणार्‍या मुलींमध्ये एक कमजोरी ही असते की त्यांना सहज विश्वासात घेता येते, ज्यामुळे त्यांची कधीकधी फसवणूक सुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे झोपणार्‍या मुलींसाठी मुलांचे लुक्स काही खास महत्वाचे नसतात.

उशी किंवा सॉफ्ट टॉय घेऊन झोपणारी
अशा झोपणार्‍या मुली खुपच चंचल स्वभावाच्या असतात. या मुली स्वप्नात जगणे आणि स्वप्न पहाणे पसंत करतात. जी मुले यांची काळजी घेतात आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ देतात, अशी मुले त्यांना आवडतात.

चादर ओढून सरळ होऊन झोपणारी
ज्या मुली चादर किंवा ब्लॅकेट ओढून सरळ झोपतात, त्या कुटुंबाच्या नियमांचे पालन करणार्‍या असतात. अशा मुलींना बोलीभाषेत घरगुती मुली असेही म्हटले जाऊ शकते. या मुलींना साधारण स्वभावाची मुले खुप पसंत असतात. मुलांच्या बाबतीत त्यांच्या जास्त अपेक्षा नसतात.

छातीवर हात ठेवून झोपणारी
अशा झोपणार्‍या मुली खुप कमी आढळतात. अशा झोपणार्‍या मुलींना कुटुंबाच्या सुख-सुविधेशी मतलब असतो. अशा मुली कुटुंबाप्रती खुप इमानदार असतात. या मुलींना स्मार्ट मुले खुप आवडतात.

पाय पसरवून झोपणारी
अशा प्रकारे झोपणारी मुलगी निर्णय घेण्यात बेपर्वा असते. त्यांच्या व्यक्तीमत्वात खुलेपणा आणि बिनधास्तपणा असतो. अशी मुलगी चांगली मैत्रिण समजली जाते. त्यांना कमी रोकटोक करणारे आणि हसतमुख मुले जास्त आवडतात.