कमजोर डोळ्यांनी दिला धोका; चहापत्तीऐवजी टाकले कीटकनाशक औषध, दाम्पत्याचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यात एका वृद्ध दाम्पत्याचा सकाळच्या चहामुळे मृत्यू झाला. वृद्ध महिलेला कमजोर डोळ्यांमुळे चहापत्ती ओळखता आली नाही. जेव्हा चहापत्ती कमी पडली तेव्हा वृद्ध महिलेने चहापत्तीच्या जागी दुसर्‍या खोलीतून कीटकनाशक आणले आणि उकळत्या पाण्यात कीटकनाशक औषध टाकले. हा चहा पिल्याने वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला, त्यांच्या मुलाचे प्राण मात्र वाचले.

वृद्धांचे डोळे कमजोर होते

मुंगावली परिसरातील कचियाना परिसरातील रहिवासी श्रीकिशन सेन आणि कोमलबाई या वृद्ध जोडप्यासाठी सकाळचा चहा त्यांचा शेवटचा चहा असेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. नेहमीप्रमाणे त्या महिलेचा पती श्रीकिशन मंदिरात जायला तयार होत होते. पत्नी कोमलबाई स्वयंपाकघरात गेल्या आणि चहा बनवू लागल्या. चहापत्ती संपल्यावर त्या दुसर्‍या खोलीत गेल्या. डोळे कमजोर होते, ज्यामुळे त्यांना कमी दिसत होते. यामुळे त्यांनी चहापत्तीऐवजी पॅकेटमध्ये असलेले कीटकनाशक औषध उचलले.

मुलाची प्रकृती धोक्याच्या बाहेर

स्वयंपाकघरात आल्यानंतर त्यांनी उकळत्या पाण्यात कीटकनाशकदेखील टाकले. त्यांनी पतीला चहा दिला आणि मुलाने उठल्यावर त्याने स्वत: चहाही प्यायला. चहा प्यायल्यानंतर श्रीकिशन सेन सायकलवरून मंदिराकडे निघाले. त्यांनी काही अंतर गाठले, नंतर ते चक्कर येऊन पडले. यावेळी मुलाने चहादेखील प्यायला, त्यामुळे त्याला चहा कडू वाटला. त्यामुळे त्याने चहा कमी पिला. याच दरम्यान, शेजारचे श्रीकिशन यांची बातमी घेऊन दाराजवळ पोहाेचले.

मुलगाही या जोडप्याबरोबर चहा प्यायला

श्रीकिशन यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे घरात कमलाबाई आणि मुलगा जितेंद्र यांचीही प्रकृती बिघडू लागली. या दोघांनाही नातेवाईकांनी दवाखान्यात घेऊन गेले, तेथे डॉक्टरांनी कमलाबाईला मृत घोषित केले, तर उपचारादरम्यान जितेंद्रचा जीव वाचला.

या प्रकरणाची माहिती मिळताच मुगावली पोलीस स्टेशनचे प्रभारी सोनपालसिंग तोमरही घटनास्थळी दाखल झाले. चहापत्तीच्या जागी चुकून कीटकनाशक औषध टाकल्याची माहिती पोलीस स्टेशन प्रभारी यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याच वेळी, एका वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली आहे. दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

You might also like