स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी; ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या मृत्यू

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा सातवा बळी गेला आहे. यात ७२  वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जानेवारी पासून शहरात एकूण ४१ रुग्ण आढळले, त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.अकरा रुग्णांवर सध्या उपचार सुरू, त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जानेवारी ते जून दरम्यान एकच रुग्ण दगावला होता तर ऑगस्ट मध्ये मात्र सहा रुग्णांचा बळी गेला.

पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालयात आंबेगाव येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीला पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ११ रुग्ण हे स्वाईन फ्ल्यूने बाधित आहेत.त्यामुळे नागरिकांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत ६१ जणांचा स्वाइन फ्ल्यूने बळी घेतला होता. सद्य स्थितीला एकूण ११ जण स्वाइन फ्ल्यूने बाधित रुग्ण आढळले आहेत. त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्दी,खोकला,ताप हे लक्षण आढळल्यानंतर लवकरात लकवर डॉक्टरांना भेटावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या घ्याव्यात, सोबतच प्रतिबंधक लस घ्यावी. असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.