वयस्कराने केली अशी परतपेड ! ‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर डॉक्टरांना आणून दिला शेतातील तांदूळ

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना योध्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि जीव वाचवणार्‍यांचे आभार मानन्यासाठी अनेकजण त्यांना अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणत आहे. असाच एक अनुभव एका महिला डॉक्टरला आला आहे. महिला डॉक्टरने कोरोनाबाधित एका वयस्कर व्यक्तीवर उपचार केले होते. याची परतफेड म्हणून या व्यक्तीने महिला डॉक्टरला घरी पिकवलेले तांदूळ आणून दिले आहेत.

डॉक्टर उर्वी शुक्ला यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. एक वयस्कर व्यक्ती कोरोनामधून पूर्णपणे बरी झाली. ही व्यक्ती 15 दिवस केंद्रामध्ये दाखल होती. त्यापैकी 12 दिवस व्हेंटीलेटरवर होती. आता बरे झाल्यानंतर आम्हाला धन्यवाद म्हणण्यासाठी त्यांनी टीममधील प्रत्येकाला घरी पिकवलेल्या तांदळाची पाकिटे आणून दिली आहेत, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये शुक्ला यांनी तांदळाच्या पाकिटाचा फोटोही ट्विट केला आहे. रुग्णाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे शुक्ला भारावून गेल्या आहेत. हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. 3 हजार 300 हून अधिक जणांनी ते लाईक केले आहे. तर 500 हून अधिक जणांनी ते रिट्विट केले आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. त्यांच्या भावनांचा मान ठेवायला हवा. हा केवळ तांदूळ नसून मनापासून दिलेला आशिर्वाद आहे. स्वत:च्या कष्टाचे पीक त्यांनी तुम्हाला दिले आहे. तुम्ही पोस्ट केलेल्या या फोटोसाठी धन्यवाद. असे म्हटले आहे.