महिलेची ‘टेस्ट’ करताच ‘दचकले’ डॉक्टर, ‘युरीन’च्या जागी बनत होती ‘दारू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या पिट्सबर्ग विद्यापीठातून एक आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. एका वृद्ध महिलेच्या शरीरात चक्क अल्कोहोल तयार होत आहे. तपासणीदरम्यान ही वस्तुस्थिती उघड झाली, त्यामुळे डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

सांगितले जात आहे की, वृद्ध महिलेचे वय ६१ वर्ष आहे. ही महिला बऱ्याच काळापासून सिरोसिस आणि डायबिटीज बरोबर झगडत आहे. त्यामुळे तिच्या शरीरात अल्कोहोल तयार होत आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अशी प्रकरणे फारच कमी आढळतात. या स्थितीला वैज्ञानिक भाषेत ऑटो – ब्रेवरी सिंड्रोम म्हटले जाते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचे काही दिवसांतच लिवर ट्रांसप्लांट होणार होते, परंतु डोनर न मिळाल्यामुळे हे काम लांबणीवर पडत आहे.

सांगितले जात आहे की यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टरांनी या महिलेच्या अनेक चाचण्या केल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सर्व चाचण्यांमध्ये रिजल्ट सकारात्मक दिसला. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी असा संशय व्यक्त केला आहे की महिलेने छुप्या पद्धतीने मद्यपान केले आहे, ज्याला ती लपवत आहे. मात्र, डॉक्टरांनी जेव्हा महिलेची रक्त तपासणी केली तेव्हा त्यात अल्कोहोलचा पुरावा मिळालेला नाही.

एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये महिलेच्या आरोग्याबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. असे म्हटले आहे की महिलेच्या यूरिन तपासणीमध्ये ग्लूकोजचे प्रमाण जास्त आढळून आले आहे, त्यास हायपरग्लाइकोसुरिया देखील म्हटले जाते.

एवढेच नव्हे तर ती महिला मधुमेहाची रुग्ण देखील आहे, ज्यामुळे तिच्या यूरिनमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त आढळले. त्याच वेळी, या प्रकरणाचा तपास करणारे वैज्ञानिक म्हणतात की त्या महिलेच्या मूत्राशयात भरपूर यीस्ट आहेत, ज्यामुळे साखर इथेनॉलमध्ये बदलत आहे.

ग्लूकोजचे सतत इथेनॉलमध्ये रूपांतर झाल्यामुळे मूत्राशयात इथेनॉल किंवा अल्कोहोलची पातळी वाढली आहे. महिलेच्या शरीरात मोठ्या प्रमाणात यीस्टकेन्डिडा ग्लाबेरेटा सापडला आहे. ते काढण्यासाठी अनेकदा एंटी – फंगल ट्रीटमेंट केली गेली परंतु यश मिळू शकले नाही. यादरम्यान महिलेच्या रक्तातील साखर देखील वाढली.