…म्हणून पार्थ पवारला बारामतीतून तिकीट नाकारले

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवारांना घराणेशाही चालवायची असल्याने त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाबळेश्वर येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. पार्थ पवार यांना पडण्यासाठी मावळमधून उभे केल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

शरद पवारांवर निशाणा साधताना चंद्राकांत पाटील म्हणाले, शरद पवारांचे नातवा पेक्षा लेकीवर जास्त प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी लेकीला बारामतीमधून उभे केले तर नातवाला पडण्यासाठी मावळमधून उमेदवारी दिली. नातवाला निवडून आणायचेच होते तर मग त्यांनी पार्थला बारामतीमधून का उमेदवारी दिली नाही, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. शरद पवारांना त्यांच्या पक्षात घराणेशाही चालवायची असल्याने त्यांनी स्वत:च्या मुलीला उमेदवारी दिल्याचा टोला लगावला.

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार इच्छूक आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पार्थ पवार यांना पडण्यासाठी मावळमधून उमेदवारी दिली. उद्या समजा रोहीत पवार यांना विधानसभा द्यायची असेल तर त्यांना बारामती विधानसभा द्यावी. मात्र, त्याठिकाणी अजीत पवारांना उमेदवारी देणार आणि रोहितला पडण्यासाठी लांब पाठवणार असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा