पिंपरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या हालचाली

वाढदिवसाच्या निमित्ताने नगरसेवक मोरे यांचे शक्तिप्रदर्शन


पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

विधानसभा निवडणुकीच्या तयारी सर्वच ठिकाणी सुरु झाल्या आहेत. शहरातील पिंपरी विधानसभा मतदार संघ भाजप व आरपीआय (आठवले गट) यांच्या युतीत आरपीआयकडे आहे. राष्ट्रवादीचे आमदार असणारे आण्णा बनसोडे यांचा पराभव करून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विजयी झाले. यावेळी आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीही चांगली टक्कर दिली. पिंपरीची जागा आरपीआयकडे असली तरी सध्या पक्षातील प्रबळ इच्छुक पाहता ही जागा भाजपाला मिळावी यासाठी सर्वपरी प्रयत्न सुरू आहेत. यातच नगरसेवक शैलेश मोरे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभेला पक्षाकडून आपण प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. संपर्ण मतदार संघात ‘होल्डिंग’ झळकत होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ade2fbf8-c86b-11e8-b26b-ef152e816d87′]

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि भोसरी विधानसभा ही भाजपकडे आहे तर पिंपरी हा राखीव मतदार संघ सध्या शिवसेनेकडे आहे. तोही आपल्याकडे घेऊन तिन्ही मतदार संघ आपल्याकडे ठेवण्यासाथी भाजपच्या हालचाली सुरू आहेत.

मागील निवडणुकीत आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे शिवसेनेकडून पराभूत झाल्या असल्या तरी आता पुन्हा एकदा त्या लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. याशिवाय आरपीआयकडून अमित मेश्राम हेदेखील इच्छुक आहेत. तसेच पिंपरीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांनीदेखील तयारी सुरू केली असून जितेंद्र ननवरे हेदेखील विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरीचा गड ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा तयारी लागले असून त्यांनी ‘ग्राऊंड लेव्हल’वर कामकाज सुरू केले आहेत. तर भाजपाकडून शैलेश मोरे, अमित गोरखे,वेणू सावळे आणि सीमा सावळे हे तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. प्रत्येक इच्छुक वेगवेगळ्या प्रकारे मतदार संघात ऍक्टिव्ह आहे. सावळे यांनी पिंपरी मतदार संघात आरोग्य शिबिरे घेऊन आपणही रिंगणात असल्याचे दाखवून दिले.

खळबळजनक…! पुणे महापालिकेचा अतिमहत्त्वाचा डेटा करप्ट

राजकारणातील तरुण चेहरा म्हणून भाजपाकडून शैलेश मोरे आणि वेणू साबळे यांचे नावे आहे. मोरे हे विद्यमान नगरसेवक असून त्यांचा प्रभाग याच मतदारसंघात येतो. तसेच ते पिंपरीत वास्तव्य असल्यामुळे त्यांना या मतदार संघाचा चांगला अभ्यास आहे. नगरसेवक म्हणून त्यांचे काम आहेच; परंतु त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. तरुण नेतृत्व असल्यामुळे मोरे यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फौज आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.

नुकताच शैलेश मोरे यांचा वाढदिवस झाला. वाढदिवसाचे निमित्त साधून केलेले शक्तिप्रदर्शन ते आगामी निवडणुकीची तयारी करत असल्याचे दर्शवत होते. तसेच ‘पिंपरीत बदल नक्की बरका‘ असे सूचक घोषवाक्य असलेले अनेक होर्डिंग्ज मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मतदार संघात सर्वत्र लावले होते. त्यामुळे मोरे हे सर्व ताकदीनिशी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या मतदार संघात सुरू आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6a7b14b-c86b-11e8-9cf4-e129af4e991a’]

आझमभाई पानसरे व आमदार लक्ष्मण जगताप यांचा वरदहस्त शैलेश मोरे यांच्यासह भाजपचे सर्वच इच्छुक आपल्याला असल्याचे सांगत आहेत.मात्र हा मतदार संघ भाजपला सुटल्यानंतर कोण कोणाला वरदहस्त देणार यावर सगळी गणिते मांडता येणार आहेत. आझमभाई पानसरे यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांचाच शिष्य शैलेश मोरे यांना भाजपा तिकीट दिले जाऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आझमभाई पानसरे यांच्या जोरावर पिंपरी विधानसभा मतदार संघात कमळ फुलू शकते, असा विश्‍वासही भाजपा कार्यकर्त्यांना वाटत आहे.

मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लागलेले फलक पाहता सर्वच पक्षातील नगरसेवक त्यांचे चांगले मित्र आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन असणारी त्यांची मैत्री त्यांना निवडणुकीत महत्वाची ठरू शकते. मात्र हे सर्व हा मतदार संघ भाजपकडे आला आणि पक्षातील इतर दिग्गज इच्छुकांच्या स्पर्धेतून पक्षाने मोरे यांच्यावर विश्वास दाखवला तर शक्य आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea38639b-c86b-11e8-93db-d33c63f8e520′]