निवडणुक शाखेचा लिपिक अँटी करप्शनच्या ‘जाळ्यात’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या काळात वाहन वापरल्याचे बिल मंजूर करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या निवडणुक शाखेच्या कनिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. राखमाजी शेषराव चवणे (वय ४५, रा. गव्हाणकर चाळ, बाजारपेठ, खालापूर, जि. रायगड) असे या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

चवणे हा पनवेल तहसील कार्यालयातील निवडणुक शाखेत कनिष्ठ लिपिक आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ४५ वर्षाच्या व्यावसायिकाने तक्रार दिली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांचे वाहन वापरण्यात आले होते. मे महिन्यातील हे बिल मंजूर करण्यासाठी चवणे याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी करताना चवणे याने साडेचार हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, त्यांचे सहकारी बळीराम पाटील, विश्वस गंभीर, निशांत माळी, घरत यांनी पनवेल तहसील कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच घेताना राखमाजी चवणे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like