पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ ,तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात येईल. छत्तीसगडमधील १८ नक्षलग्रस्त मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जागांसाठी मतदान २० नोव्हेंबरला होईल.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc74feed-c954-11e8-9158-81d53a5936b1′]
मध्यप्रदेश आणि मिझोराम या दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात २८ नोव्हेंबरला मतदान पार पडणार. ७ डिसेंबरला राजस्थान, तेलंगणामध्ये या राज्याच्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी होणार असून या निवडणुकांचे ११ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत.

[amazon_link asins=’B01N3AI9EY,B074NW2Q3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]