खुशखबर ! प्राध्यापक भरतीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील ; ‘एवढ्या’ जागांसाठी होणार भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्राध्यापक भरतीला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे खोळंबलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ३ हजार ५८० पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली. राज्यात एकूण ३ हजार ५८० पदांची प्राध्यापक भरती होणार आहे.

राज्यातीत दहा अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची जवळपास ९ हजार ५८० पदे रिक्त आहेत. राज्यातील महाविद्यालयांमध्ये पुरेसे प्राध्यापक नसल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या काही योजना मिळत नसल्याची तक्रार महाविद्यालये आणि प्राध्यापक संघटनांनी केली होती. तसेच प्राध्यापक भरतीमुळे आचारसंहिता भंग होत नसून भरती सुरू करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने पदभरतीस मान्यता दिली आहे. मात्र सरसकट पदभरती न करता ज्या पदांना यापूर्वी मान्यता मिळाली आहे, त्या पदांची भरती करता येणार आहे. एकूण ३ हजार ५८० पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. प्राध्यापक भरतीची निवड यादी राज्यातील निवडणुका झाल्यानंतर म्हणजे २९ एप्रिलनंतर जाहीर करता येणार आहे.