
Election Commission | देशातील 7 ठिकाणच्या पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर, पुणे आणि चंद्रपूरच्या जागेवर निवडणूक नाहीच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Election Commission | देशातील 7 ठिकाणी रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक (Assembly By-elections) निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील पुणे (Pune) आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या (Chandrapur Lok Sabha Constituencies) रिक्त जागेबाबत निवडणूक आयोगाने (Election Commission) कोणतीही घोषणा केली नाही. आयोगाने आज जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन्ही मतदार संघाची नावे नाहीत.
निवडणूक आयोगाने (Election Commission) झारखंड, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 5 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे जागा रिक्त
झाली आहे. तसेच बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.
लोकसभा निवडणुकीला आता एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक असल्याने या मतदारसंघामध्ये निवडणूक होणार
चर्चा सुरु होती.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात पुणे आणि चंद्रपूरबाबत काहीही
घोषणा केली नाही. त्यामुळे पुणे आणि चंद्रपूर या दोन जागांवर निवडणूक होणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा