धनंजय मुंडे अडचणीत, आचारसंहिता भंग केल्याची तक्रार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. सर्व पक्षीय प्रचार, सभा, रॅली यांना वेग आला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा घोषित करण्यासाठी मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद सरकारी बंगल्यात आयोजित करण्यात आली होती. पण आचार संहितेत सरकारी संपत्तीचा वापर करता येत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार ए वॉर्ड ऑफिसरने तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. आता या सर्व प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात वारंवार वाद प्रतिवाद होत असतात. बीडमध्ये तसेच राज्यभरात याची चर्चा असते. पण आता धंनजय मुंडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केल्यामुळे विरोधक मात्र या गोष्टीचा फायदा उठवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यपालांनीच केले आचारसंहितेचे उल्लंघन ? आयोग राष्ट्रपतींना लिहणार पत्र
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. नेत्यांकडून किंवा पक्षाकडून तसेच अन्य कोणाकडून आचारसंहितेचे उल्लंघन केले जात नाही ना याकेड निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. अशातच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन आयोगाने नाराजी व्यक्त केली असून आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या संदर्भात आयोग राष्ट्रपतींना पत्र लिहण्याचा विचार करत आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. नेत्यांकडून किंवा पक्षाकडून तसेच अन्य कोणाकडून आचारसंहितेचे उल्लंघन केले जात नाही ना याकडे निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. अशातच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन आयोगाने नाराजी व्यक्त केली असून त्यावर आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. इतक नव्हे तर आयोग यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र देखील लिहण्याचा विचार करत आहे.

अलिगडमध्ये २५ मार्च रोजी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदींना समर्थन दिले. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे देखील कल्याण सिंह यांनी म्हटले आहे. देशातील सर्व नागरिक हे भाजपचे कार्यकर्ते आहे. माझी इच्छा आहे की भाजपने निवडणूक जिंकावी. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हे देशासाठी गरजेचे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

कल्याण सिंह यांच्या या विधानावर आज आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्या विधानावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच आयोग राष्ट्रपतींना किंवा कल्याण सिंह यांना पत्र देखील लिहू शकते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले कल्याण सिंह यांनी बाबरी मशिद पाडल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. ते १९९१ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. यानंतर सप्टेंबर २०१७ ते १२ नोव्हेंबर १९९९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर होते.