निर्माता राम गोपाळ वर्माला निवडणुक आयोगाचा मोठा दणका

‘लक्ष्मी की एनटीआर’या बायोपिकवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पी एम मोदी’ या मोदींवरील बायोपिकवर निवडणुक आयोगाने सुरुवातीला बराच काळ गोंधळ घातला असला तरी आता आयोगाने त्यातून स्वत:ला सावरले असून १ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या राम गोपाळ वर्माच्या ‘लक्ष्मी की एनटीआर’या बायोपिकवर बंदी आणली आहे.

निर्माता राम गोपाळ वर्मा यांचा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या जीवनावरील चित्रपट ‘लक्ष्मी की एनटीआर’ हा १ मे रोजी प्रदर्शित होणार होता. त्याअगोदर एक दिवस निवडणूक आयोगाने पुढील आदेश देईपर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे.

या अगोदर आंध्र प्रदेशचे राज्य निवडणुक आयुक्तांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.