Election Commission | मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता 18 वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मतदार यादीमध्ये (Voter List) नाव नोंदणी करण्यासाठी आता 18 वर्ष पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. करण निवडणूक आयोगाने (Election Commission) यासंदर्भात मोठा निर्णय घेत तसे नवीन निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशानुसार 17 वर्षावरील युवक – युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मूभा देण्यात आली आहे. मतदार नोंदणीबाबत तांत्रिक बाबी दूर करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajeev Kumar) आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे (Election Commissioner Anup Chandra Pandey) यांनी सर्व राज्यातील निवडणूक आयोगांना आदेश दिले आहेत.

 

प्रत्येक तिमाहीला यादी अपडेट होणार

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशानुसार, आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी 1 जानेवारीला वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. तरुण 17 वर्षापेक्षा अधिक असतील तर त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरावा लागेल. नव्या मतदारांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरपासून नाव नोंदणी करता अर्ज भरता येणार आहे. प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाणार आहे. यातील पात्र मतदारांना त्यानंतरच्या तिमाहित होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे.

ओळखपत्र दिले जाणार

नाव नोंदणी झाल्यानंतर नवीन मतदारांना निवडणूक आयोगाकडून ओळखपत्र (Identity Card) जारी केले जाईल.
मतदार यादी 2023 मध्ये त्यात बदल केले जातील.
कुठलाही नागरिक 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होतील त्याची नव्या मतदार यादीत नाव समाविष्ट असेल.
नुकतेच आरपी अधिनियमात (RP Act) दुरुस्ती केली आहे.
या दुरुस्तीनुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी योग्यता वर्षातून तीन वेळा देण्यात येईल.
यापूर्वी केवळ 1 जानेवारीची पात्रता तारीख मानली जात होती.

 

याशिवाय आधार कार्ड संदर्भात (Aadhaar Card) आयोगाने सांगितले की, आधार नंबर मतदार यादीशी जोडण्याबाबत नोंदणी फॉर्ममध्ये मतदारांसाठी तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या मतदारांसाठी आधार नंबर लिंक करण्यासाठी नवीन फॉर्म 6 ब आणला आहे. मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी कोणत्याही अर्जाला नकार देण्यात येणार नाही.

 

ऑनलाईन अर्जासाठी काय करायचे ?

मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्रमांक 6 ब मध्ये भरुन देऊ शकतो.
या अर्जाच्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केल्या जातील.
तसेच हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल.
अर्ज क्रमांक 6, 7 व 8 मध्ये 1 ऑगस्ट पासून सुधारणा करण्यात येत आहे. नमुना 6 ब नव्याने तयार केला आहे.
सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदान यादीतील बदल किवा नोंदणीची प्रक्रिया करावी.

 

Web Title : –  Election Commission | election commission allows students above 17 years to apply in advance for voter id card

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा