निवडणुक आयोगाची मोदींना ८ व्यांदा ‘क्लिन चीट’ ; औसाच्या सभेबाबतही दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणुक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची सुनावणी घेऊन त्यांना एका पाठोपाठ क्लिन चीट दिली आहे. नरेंद्र मोदी यांना आणखी दोन तक्रारीवर दिलासा देत त्यांनी आचारसंहिता भंग केला नसल्याचे सांगत क्लिनचिट दिली आहे. आता नरेंद्र मोदी यांना ८ तक्रारीत क्लिन चीट मिळाली आहे. मात्र, आयोगातील एक आयुक्त या मताशी सहमत नसल्याने आयोगाने अजून हे दोन निकाल सार्वजनिक केले नाहीत.

दरम्यान, अहमदाबाद येथे २३ एप्रिल रोजी मतदानाला जाताना व मतदान करुन आल्यानंतर मोदींनी जो रोड शो केला. त्यात कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग झाला नसल्याचे मत गुजरात निवडणुक आयोगाने व्यक्त केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांची लातूर जिल्ह्यातील औसा येथे पहिली प्रचार सभा ९ एप्रिल रोजी झाली होती. या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम सैनिकांच्या नावाने तुमचे पहिले मतदान करा, असे आवाहन प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणाईला केले होते. तसेच बालाकोट हवाई हल्ल्यातील सैनिकांना तुमचे मत समर्पित करा असे सांगितले होते. त्याबाबत काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच त्याच दिवशी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथेही मोदी यांनी सैनिकांच्या नावाने मते मागितली होती. या दोन्ही तक्रारी निवडणुक आयोगाने फेटाळून लावत मोदी यांनी आचारसंहिता भंग केला नसल्याचा निर्णय दिला आहे.

अमित शहा यांच्या दोन भाषणांना आणि राहुल गांधी यांच्या एका भाषणालाही निवडणुक आयोगाने क्लिन चीट दिली आहे.

Loading...
You might also like