‘या’ मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान

हैद्राबाद : वृत्तसंस्था – देशभर सर्वत्र आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यंदा EVM मशिन्सद्वारे सर्वत्र मतदान पार पडणार आहे मात्र देशातलं एक राज्य असे आहे जिथे EVM नाही तर बॅलेट पेपरवर मतदान केले जाणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडे नाही तर हैद्राबाद मतदार संघात बॅलेट पेपर द्वारे मतदान केले जाणार आहे. हैद्राबाद मतदार संघात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी हैद्राबाद मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे.

या मतदार संघाची आणखी एक विशेष बाब म्हणजे या मतदार संघात यंदा तब्बल १८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी १७८ हे शेतकरी आहेत. केवळ ६४ उमेदवारांसाठीच EVM चा वापर शक्य आहे त्यामुळे आयोगाने यंदा हैद्राबाद मतदार संघात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गुरुवार पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख होती मात्र अर्ज मागे घेण्यासाठी शेतकरयांनी नकार दिला आहे. त्यामुळे आता हैद्राबाद मतदार संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.