Election Commission Hearing NCP | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? केंद्रीय निवडणूक आयोगात उद्या सुनावणी

नवी दिल्ली : Election Commission Hearing NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कोणाचा, यावरून शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission Hearing NCP) पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित राहणार असल्याचे समजते.

मागील सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले होते. अजित पवार गटाने खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत अजित पवार यांच्याकडे काहीच समर्थन नसल्याचा दावाही करण्यात आला होता.

०२ नोव्हेंबरच्या सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवार गटावर प्रतिज्ञापत्रांवरून मोठे आरोप केले होते. यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली होती. मात्र, हे आरोप अजित पवार गटाने खोडून काढले होते. (Election Commission Hearing NCP)

येत्या सुनावणीत पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटाचे ऐकणार आहे.
या सुनावणीपूर्वी दिल्लीत शरद पवार गटाची एक बैठक होण्याची शक्यता आहे.
०२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणी अजित पवार गटाने सलग सुनावणीची मागणी केली होती.
यामुळे कदाचित निवडणूक आयोग सलग सुनावणी घेऊ शकतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

राणेंचे नाव न घेता जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा, ”तेव्हा दबावामुळे विरोध केला, आता करणार नाहीत”

भाजपा नेत्याचा भुजबळांना इशारा, ‘जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास…’

पुण्यात जरांगे पाटील यांची सभा, पुणे-नगर रोडवरील वाहतूक व्यवस्थेत बदल