निवडणूक आयोगाने आयकर विभागाला खडसावले, छाप्यांपुर्वी पुर्वसुचना द्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऐन लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत मध्य प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशात टाकण्यात आलेल्या छाप्यांवरून निवडणूक आयोगाने आयकर विभागाला नाराजी व्यक्त करत खडसावले आहे. कारवाईची दखल घेतली असून आयकर विभागाची कानउडणी करत छापा टाकायचाच असेल तर आधी केंद्रीय किंवा राज्य निवडणूक आयोगाला याची पूर्वसुचना द्या अशी तंबी आयोगाने आयकर विभागाला दिली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या जवळचे नातेवाईक, सहकाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. सत्तेचा गैरवापर करत भाजपच्या सांगण्यावरूनच हे छापे घातले असल्य़ाचा आरोप काँगेसने केला आहे. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे काँगेसने केली होती. त्याची गंभीर दखल आता निवडणूक आयोगाने घेतली असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउडणी आयोगाने केली आहे. मध्यप्रदेशात जी छापेमारी केली त्याची माहिती दिली नाही. त्यामुळे निवडणूकीच्या काळात कुठेही छापा टाकायचा असल्यास आधी निवडणूक आयोगाला याची माहिती निवडणूक आयोगाला देणे गरजेचे आहे. असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.