आजपासून निवडणूक आयोगाकडून Voter ID चं ‘व्हेरिफिकेशन’ ! तुमचं ‘कार्ड’ घरबसल्या ‘व्हेरिफाईड’ करा, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने आज पासून (दि. १ सप्टेंबर) एक विशेष मोहिम सुरु केली आहे. यामध्ये तुमच्या रेशन कार्ड नंतर मतदान ओळखपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी स्वत:च्या ओळखपत्राची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.

घरबसल्या स्वत:च्या कुटुंबातील किती सदस्यांची नावे यादीमध्ये नोंदवण्यात आली आहेत हे आता पाहता येणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांची नावे योग्य प्रकारे नोंदवण्यात आली आहेत की नाही हे देखील पडताळून पाहता येणार आहे. या नव्या मोहिमेंतर्गत सर्व मतदार यादीत नोंद असलेल्या मतदारांचा तपशील डिजिटल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाचे कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत पोहचणार असून मतदारांच्या ओळखपत्रांची पडताळणी करणार आहेत. तसेच नवी नावनोंदणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन व्हिरिफिकेशनसाठी अर्ज करता येणार आहे. या विषयी अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाने 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. पडताळणीसाठी वाहन चालविण्याचा परवाना, आधारकार्ड, रेशन कार्ड, शासकीय ओळखपत्र, बँक पासबुक, शेतकरी ओळखपत्र सादर करावे लागणार आहे.

काय करावे लागेल ?
यादी आणि नावांच्या तपासणीसाठी मतदारांना गुगल प्ले स्टोअरवरून व्होटर हेल्पलाईन मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपमधील निर्देशांनुसार यादी पडताळता येईल. दिव्यांग मतदार जिल्हा संपर्क केंद्रावरही यादी पडताळून पाहू शकतात. मतदान ओळखपत्राच्या पडताळणीसोबत मतदारांच्या माहितीची देखील पडताळणी केली जाणार आहे. मतदान केंद्रांच्या जीआयएस मॅपिंगचे काम देखील केले जाणार आहे. मतदारांचे संपर्क क्रमांक जमवण्यासह नव्या मतदारांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like