Election Commission – NPC | निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Election Commission – NPC | निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnatak Assembly Election) घडयाळ चिन्हावरच लढणार आहे. राष्ट्रवादीने विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. NCP चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटकमध्ये होणार्‍या निवडणुकीत पक्ष कोणत्या चिन्हावर निवडणुका लढवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलास दिला आहे. (Election Commission – NPC)

याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी (NCP R Hari) म्हणाले की, आम्ही कर्नाटकमध्ये 46 जागांवर निवडणुक लढणार आहोत. आमचं पक्षाचं चिन्ह फ्रिज झालं होतं. कर्नाटकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. आमच्याकडे सध्याचा भाजपचा आमदार (BJP MLA) काही दिवसांपुर्वी आला आहे. त्यामुळे आमची काहीशी ताकद वाढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढविता येणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीदरम्यान 5 ते 6 सभा होणार आहेत. (Election Commission – NPC)

तब्बल 23 वर्षानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता.
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र (Maharashtra) आणि नागालँड (Nagaland) या 2 राज्यापुरता असणार आहे.
एकंदरीत निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटकामध्ये घडयाळ चिन्हावर
निवडणूक लढविता येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title :- Election Commission – NPC | ncp to contest karnataka assembly election with clock ghdyal sign election commission decision after request from party

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख