Election Commission of India (ECI) | शरद पवारांना निवडणूक आयोगाचा धक्का, ‘आम आदमी पार्टी’ला राष्ट्रीय दर्जा तर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चा राष्ट्रीय दर्जा गमावला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Election Commission of India (ECI) | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India (ECI) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या ‘आम आदमी पार्टी’ला (Aam Aadmi Party (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा (National Party) दिला आहे. तसेच आम आदमी पार्टीचे निवडणूक चिन्ह झाडू राहणार आहे. तर ईशान्येकडील राज्यांतील पराभवानंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. लोक जनशक्ती पक्षाला Lok Jan Shakti Party (रामविलास पासवान) नागालँडमध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाचा शरद पवारांना धक्का
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission of India (ECI) राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या बाहेर घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही.
Election Commission grants national party status to Aam Aadmi Party
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच मिळते जेव्हा त्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली असतील. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजे तीन राज्यांतून 11 जागा जिंकाव्या लागतात.
Nationalist Congress Party loses national party tag: EC
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
काय मिळतात फायदे?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेल्या राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळत असतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकते. तसेच दिल्लीत राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जीते. याशिवाय निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही त्या पक्षाला दिला जातो.
Election Commission withdraws national party status of Trinamool Congress, CPI
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
कसा काढला जातो राष्ट्रीय दर्जा
पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा 2019 चे नियम लक्षात घेण्यात आले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तेथील आकडेवारी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी पक्षासह तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि सीपीआय (CPI) पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
या पक्षांनी गमावला राज्य पक्षाचा दर्जा
नागालँडमध्ये लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
बंगाल आणि त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा कायम राहीला आहे.
टिपरा मोथा पक्ष त्रिपुरामध्ये राज्य पक्ष म्हणून ओळखला जातो.
आंध्र प्रदेशात बीआरएसने (BRS) राज्य पक्षाचा दर्जा गमावला आहे.
राष्ट्रीय लोकदलाने उत्तर प्रदेशात राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा गमावला आहे.
Web Title :- Election Commission of India (ECI) | nationalist congress party loses national party tag ec sharad pawar news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Dsk Vishwa Water Problem – MP Supriya Sule | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार
MP Udayanraje Bhosale | ‘…तर मी आव्हानांना भीक घालत नाही’, उदयनराजेंचा अजित पवारांना टोला (व्हिडिओ)
RAJIV Gandhi e -Learning School Pune | राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलला ‘ISO 9001’ मानांकन