Election Commission of India | ‘आम्ही निवडणूक आयोगात योग्य लोकांचीच निवड करतो’ – केंद्र सरकार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – निवडणूक आयोगातील (Election Commission of India) मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या निवडींबाबात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही प्रश्न केले होते. त्याला केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. आम्ही निवडणूक आयोगावर योग्य लोकांच्याच निवडी करतो, असे केंद्र सरकार म्हणाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावरील (Election Commission of India) अधिकारी आणि आयुक्तांच्या निवडी अत्यंत पारदर्शक पद्धतीने केल्या जातात, असेही केंद्र सरकारने म्हंटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांच्या निवडी पारदर्शक पद्धतीने केल्या जाण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही प्रश्न केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांच्या निवडींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायालयाने हे प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांची एक छोटी समिती तयार करण्यात येऊन या समितीच्या शिफारशीद्वारे आयुक्तांची निवड करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

यावेळी याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले, भारतीय राज्यघटनेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि
इतर दोन निवडणूक आयुक्तांची निवड कशा पद्धतीने करण्यात यावी, यावर काही ठोस लिखाण नाही.
किंवा नियम नाहीत. पण, ही दोन्ही पदे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत.
त्यामुळे लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी यावरील व्यक्ती हा पारदर्शक प्रक्रियेतून आला असला पाहिजे.
तसेच सर्वसमावेशक असला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांवर जरी आरोप झाले, तरी निवडणूक आयोगाने
त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागेपुढे पाहता कामा नये. निवडणूक आयुक्त सक्षम आणि कार्यक्षम पाहिजेत.

Web Title :- Election Commission of India | right people being selected in election commission of india eci central government s reply to the supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray – BMC Elections | मनपा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र, म्हणाले – ‘जिंकण्यासाठी मैदानात उतरूया, बीएमसी आपल्याकडेच राहणार’

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…