निवडणूक आयोगाची ‘मनसे’ ला नोटीस, ‘झेंडा’ वादात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगानं शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने संभाजी ब्रिगेडसह राज्यातील इतर संघटनांच्या तक्रारीची दखल घेऊन हे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अलीकडच महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आपली राजकीय भूमिका बदलली आहे. यापूर्वीचा चौरंगी झेंडा बदलून त्याजागी संपूर्णपणे भगवा ध्वज स्वीकारण्यात आला आहे. या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्याची सुरुवात पक्षाचा झेंडा बदलून झाली. संभाजी ब्रिगेडसह राज्यातील इतर संघटनांचा आक्षेप आहे. आणि त्यानी निवडणुक आयोगाकडे तक्रारहिं केली आहे. संघटनांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करा, या तक्रारीची दखल घेऊन आयोगानं मनसेला पत्र पाठवलं आहे. असं निवडणूक आयोगाने मनसेला म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेच्या वेळी झेंड्यामध्ये विविध रंग ठेवले होते. त्यात भगव्या, निळ्या, आणि पांढऱ्या रंगाचा समावेश होता. काही काळानंतर मनसेने भूमिकेत बदल केला मराठीचा मुद्दा हाती घेतला. मात्र झेंड्याचा रंग कायम तोच ठेवला. मनसेनं राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर पुन्हा नवी भूमिका घेतली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठी राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात धरला आहे. काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळं हिंदुत्व व मराठीची भूमिका घेताना शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे. मनसेने मराठीबरोबर हिंदुत्वाची कास धरली आहे. मनसेचा नवा झेंडा हा त्याचंच प्रतीक सांगण्यात आले आहे.