पुण्यात पर्वतीमध्ये पकडली निवडणुक आयोगाच्या पथकाने ‘कॅश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील पर्वती मतदार संघात स्थिर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास नाका बंदी दरम्यान २ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. पर्वती मतदारसंघातील ही तिसरी कारवाई आहे.
पर्वती मतदार संघात ४ स्थिर व चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

स्थिर पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सॅलिसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ नाकाबंदी केली होती. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास या पथकाला एक मर्सिडीज बेंझ संशयास्पदरित्या येताना दिसली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या मोटारीची तपासणी केल्यावर डिकीमध्ये २ लाख ३७ हजार ५०० रुपये रोकड मिळाली. ही रक्कम वडगाव शेरी येथे राहणाऱ्या सलून व्यावसायिकाची असून ती जप्त करुन स्वारगेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघात यापूर्वी महर्षीनगर येथे २ लाख ७२ हजार ३५० रुपये आणि आणि अरण्येश्वर येथील संतनगर मध्ये नाकाबंदी दरम्यान ११ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.

Visit : Policenama.com