काँग्रेसच्या राफेल अस्त्रावर निवडणुक आयोगाचा आक्षेप ; मात्र, ‘पीएम नरेंद्र मोदी’ ला क्लिन चिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राफेलचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात असून त्यातून चौकीदार चोर है हे घोषवाक्य राहुल गांधी यांनी देशभर पसरविले़ काँग्रेसच्या या मुख्य अस्त्राचा वापर करण्यास निवडणुक आयोगाने आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने जाहिरातीत राफेलचा वापर केल्याने ९ पैकी ६ जाहिरातींवर हा आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाला क्लिन चिट दिली असून निर्माते तो कधीही प्रर्दशित करु शकतील, असे निवडणुक आयोगाने सांगितले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसकडून ९ जाहिराती निवडणुक आयोगाला परवानगीसाठी पाठविल्या होत्या. त्यातील ६ जाहिरातींवर निवडणुक आयोगाने आक्षेप घेतला आहे. राफेल प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असल्यामुळे निवडणुक प्रचारात त्याचा वापर करणे योग्य होणार नाही. राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने निवडणुक आयोगाने आक्षेप घेतला आहे.

मध्य प्रदेश निवडणुक आयोगाचे प्रमुख व्हि. एल. के. राव यांनी सांगितले की, जर काँग्रेस या निर्णयावर नाराज असेल तर ते केंद्रीय निवडणुक आयोगाकडे अपील करु शकतात.

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या खिशात ३० हजार कोटी रुपये घातल्याचा आरोप राहुल गांधी यांनी सर्वप्रथम केला. नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर है’ अशी टिका केली होती. त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसल्यावर राहुल गांधी यांच्यावरच हा मुद्दा उलटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ हे कॅम्पेन हाती घेतले असून त्याला भाजप समर्थकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. निवडणुकीत हाच मुद्दा प्रमुख असताना त्याचा वापर करण्यास निवडणुक आयोगाने चक्क आक्षेप घेतल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. निवडणुक आयोग हे भाजपच्या हातातील बाहुली बनले असल्याची टिका काँग्रेसने सुरु केली आहे.

यापूर्वी कोणताही अभिनेता, अभिनेत्री निवडणुक लढवत असेल तर निवडणुक प्रचाराचा काळात या अभिनेता, अभिनेत्रीचे चित्रपट प्रर्दशित करण्यास तसेच दूरदर्शनवर न दाखविण्याचे आदेश तत्कालीन निवडणुक आयोगाच्या अध्यक्षांनी दिले होते. मात्र, या निवडणुक आयोगाने पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रर्दशित करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्याने तो चित्रपट कधी प्रर्दशित करायचा हे निवडणुक आयोग ठरवू शकत नाही असे मत व्यक्त केले आहे. हा आचार संहिता भंग नसल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे.

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने राफेलच्या मुद्दा जाहिरातीत घेण्यास आक्षेप घेणाऱ्या निवडणुक आयोगाने पीएम नरेंद्र मोदी याचित्रपटाबाबत मुंबई आणि दिल्ली येथील हायकोर्टात याचिका दाखल असतानाही त्याला मात्र काहीही आक्षेप न घेतल्याने यावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like