निवडणूक आयोग जारी करणार नवीन ‘वोटर’ कार्ड, बार ‘कोड’सह ‘या’ सुविधा असणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात नवीन मतदान कार्ड आणण्यासंबंधात निर्णय घेतला आहे. या कार्डवर बारकोडसहित उमेदवाराचा रंगीत फोटो देखील असणार आहे. याबाबतची सुरुवात कर्नाटकातून केली जाणार आहे. कर्नाटकातील मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की नवीन कार्डावर उमेदवाराचा रंगीत फोटो असेल शिवाय पहिल्यापेक्षा हे कार्ड खूप आकर्षक असेल.

संजीव कुमार यांनी सांगितले की, नवीन कार्ड हे प्लॅस्टिकने तयार होणार आहेत. तसेच यावर निवडणूक आयोगाचा होलोग्राम देखील असेल शिवाय प्रत्येक कार्डवर वेगवेगळा बारकोड देखील असेल. तसेच निवडनूक आयोग बारकोडला मतदान यादीही लिंक करण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. भविष्यात मतदारांचे नाव, पत्ता, जन्म तारीख आणि इतर माहिती बारकोडमध्येच्या माध्यमातून मिळणार आहे.

कुमार यांनी सांगितले की, नवीन मतदान कार्ड सुरु करण्यासाठी कमीतकमी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. मतदारांची संख्या लक्षात घेता यामध्ये थोडा अधिक कालावधी देखील लागू शकतो. नवीन कार्डची किंमत निवडणूक आयोगाने 30 रुपये ठेवली आहे. या दर कमी करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.

Visit : Policenama.com