PAN नंतर आता आणखी एक कार्ड ‘आधार’शी सलग्न ?, EC चे मोदी सरकारला पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर आधार कार्डला जोडल्यानंतर आता मतदान ओळख पत्र आधार कार्डशी जोडण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कायदे मंत्रालयाला पत्र लिहून मागणी केली आहे. जर मतदान कार्ड आधार कार्डला जोडले तर बोगस मतदानाला मोठा आळा बसेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

याआधी देखील त्यांनी अशाप्रकारची मागणी केली होती. मात्र न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्याने सरकारने यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र आता निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा याची मागणी केली असून या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी देखील याआधी दिल्ली हायकोर्टात यासाठी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी देखील मतदानात पारदर्शकता येण्यासाठी हि जोडणी आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर या जोडणीमुळे नागरिकांच्या कोणत्याही मूलभूत हक्कांवर गदा येणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, अश्विनी उपाध्याय यांच्यानंतर आता खुद्द निवडणूक आयोगानेच हि मागणी केल्याने केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like