अमित शहांची उमेदवारी रद्द करा

गांधीनगर : वृत्तसंस्था  – भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शपथ पत्रात आपल्या संपत्तीची माहिती लपविल्याचा आरोप करत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.

अमित शहा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज गांधीनगर येथून दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात गांधीनगरमधील एका फ्लॅटबद्दल आणि मुलाच्या कर्जाबद्दल योग्य माहिती दिलेले नाही असा आरोप कॉंग्रेसन केला आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता करून अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यात दिलेल्या शपथपत्रावरून कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.  त्यांनी आपल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती लपविल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली.