अबब ! निवडणूक आयोगाच्या हाती लागलं तब्बल १ हजार ३८१ किलो सोनं

चेन्नई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या हाती आजवरच्या कारवायांपैकी सर्वात मोठं घबाड हाती लागलं आहे. रिटेल गोल्ड कॅपिटल चेन्नईजवळच्या एका चेकपोस्टवर तब्बल १ हजार ३८१ किलो सोनं पथकाने जप्त केलं आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सोनं कुठे पाठविलं जात होतं याची माहिती स्पष्ट झाली नाही. मात्र ते एखाद्या व्यापाऱ्याचेही असू शकते. याची चौकशी सुरु आहे.

चेन्नई जवळच्या एका चेकपोस्टवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी सुरु होती. त्यावेळी एका गाडीची तपासणी करताना चक्क १ हजरा ३८१ किलो सोनं आढळून आलं. पथकाने हे सोनं जप्त केलं असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सोनं नेमकं कुठे पाठविलं जात होतं. याचा तपास पोलीस करत आहेत.

आतापर्यंत निवडणूक आयोगाने देशात मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त केली आहे. बुधवारी टिटिव्ही दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाच्या कार्यालयात छापा टाकला होता. त्यावेळी या कार्यालयातून तब्बल १ कोटी ४८ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. तेथील निवडणूक आता दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे एवढं मोठं सोनं कोणी, कशासाठी मागविलं किंवा ते कुठं पाठविलं जात आहे. याची चौकशी पथकाक़डून सुरु आहे. रिटेल गोल्ड कॅपिटल चेन्नई जवळ ते सापडल्याने एखाद्या व्यापाऱ्याचं असल्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like