‘या’ ५ कारणांमुळे झाला काँग्रेसचा ‘पराभव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या येत असलेल्या निकालावरून केंद्रात मोदी सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत २०१४ पेक्षा २०१९ मध्ये मोदी लाट जास्त असल्याचे दिसून आले. तसेच मोदी सरकारने केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य जनतेने मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान केले. तर विरोधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वास दिले होते. परंतु राहुल गांधींनी दिलेल्या आश्वासनाचा कोणताही परिणाम सर्वसामान्यांवर झालेला दिसून आला नाही. यामुळे मोदी सरकार कोणत्या कारणामुळे पुन्हा सत्तेत आले.

जातीचे समाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरण
२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने विकासाच्या मुद्यावर मते मागितली तर काँग्रेसच्या घोटाळ्यामुळे मतदारांनी काँग्रेसला डावलले. २०१९ मध्ये काँग्रेसने राफेल घोटाळा उचलून धरत मोदी सरकार विरोधात प्रचार करून देखील त्यांना मतदरांना आपल्याकडे आकर्षित करता आले नाही. दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीने सरकारच्या विकास कामाचा मुद्दा प्रचारत पुढे केला. तसेच प्रत्येक राज्यात त्या ठिकाणच्या जातीचे सामाजिक आणि धार्मिकतेवर प्रचार केला. याचा परिणाम असा झाला की मागास वर्ग आणि मुस्लीम यांना सोडून इतर सर्व धर्मियांनी भाजपाला मतदान केले.

आक्रमक आणि हायटेक प्रचार
भाजपाने २०१४ प्रमाणेच २०१९ मध्ये आक्रमक आणि हायटेक प्रचार केला. भाजपाकडून अमित शहा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान या बड्या नेत्यांनी आक्रमक प्रचार केला. तसेच भाजपाने १ हजाराहून अधिक रोड शो आणि सभा घेतल्या. यामध्ये एकट्या नरेंद्र मोदी यांनी १५० रोड शो आणि रॅली घेतल्या.

पंतप्रधान पदासाठी योग्य चेहरा नाही
भाजपा आणि एनडीए कडून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचा चेहरा होता. मात्र, विरोधातील २२ पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी असा कोणताच चेहरा नव्हता. याचा फटका आघाडीला बसला. निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू यांनी स्वत:ला पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे सांगत होते. हाच मुद्दा भाजपाने उचलून धरत विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. याचा परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादाचा मुद्दा
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने एअर स्ट्राइक केला. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचा मुद्दा या निवडणुकीत गाजला. याच मुद्दवरून भजापाने नवोदित मतदारांना ‘एक वोट जवानों के नाम’ असा नारा देत मतांची मागणी केली. तर विरोधकांनी जवानांचा उल्लेख केल्याचा आरोप करत भाजपावर निशाणा साधला. त्याच बरोबर भारताचे पायलट अभिनंदर वर्धमान यांचे पाकिस्तानातून सुरक्षित सुटका केली. या सर्व घटनांचा फायदा मोदी सरकारला झाला.

कल्याणकारी योजना
सरकारने सामान्य लोकांना प्रभावित करण्यासाठी चार प्रमुख योजना आणल्या आणि याचा उल्लेख जास्त करून या निवडणुकीत करण्यात आला. तसेच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये मिळण्याची योजना गाजली. तर विरोधकांनी मोदींनी आणलेल्या योजना कशा चुकाच्या आणि फसव्या आहेत हे मतदारांना पटवून दिले. तसेच वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याचा फायदा या निवडणुकीत होताना दिसला नाही.