राज ठाकरेंच्या सभांविषयी कट्टर विरोधक संजय निरुपम यांनी दिली ‘ही’ खोचक प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरला नाही मात्र राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे प्रचारसभा घेत आहेत. राज ठाकरेंच्या सभांविषयी प्रश्न विचारल्यावर काँग्रेसचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवार असलेले संजय निरुपम यांनी मला इरिटेट करु नका, असं उत्तर दिल आहे.

एका वृत्तवाहिनीने संजय निरुपम यांना मनसेच्या सभांविषयी प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना निरुपम म्हणाले की , ‘ जे लोक मोदी सरकारला पाडायचा संकल्प करतायेत त्यांनी आघाडीला सहयोग दिला पाहिजे. कोण कुठे सभा घेईल ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझी मनसेबद्दल काही नाराजी नाही तसेच त्यांच्या सभांना विरोध नाही. मनसेच्या विषयावर मी आता जास्त बोलत नाही. माझा कोणाला विरोध नाही तसेच निषेधही नाही. सध्या मी स्वत:ला प्रचारात झोकून दिल असून मनसे हा आता आमचा विषय नाही. त्यामुळे मनसेविषयी प्रश्न विचारून मला इरिटेट करु नका.’

तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन किर्तीकर यांच्याविषयी बोलताना संजय निरुपम म्हणाले की , ‘ किर्तीकरांना शिवसैनिकांचाच विरोध आहे. त्यांना शिवसैनिकच पाडणार. गजानन किर्तीकर म्हणजे नॉन पफॉर्मिंग अ‍ॅसेट आहेत. ते आता काहीही करु शकत नाहीत.’

उत्‍तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संजय निरुपम यांच्यासमोर शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांचे आव्हान आहे.