17 जून रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची निवडणूक, आशिया-पॅसिफिकमध्ये ‘भारत’ एकमेव दावेदार, विजय निश्चित, पाकिस्तान आणि चीनचे समर्थन

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच अस्थायी जागांसाठी 17 जून रोजी निवडणूक होत आहे. जागतिक संघटनेच्या अंतरिम कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली आहे.

सोमवारी जारी सुरक्षा परिषदेच्या या महिन्याच्या अनौपचारिक अंतरिम कार्यक्रमानुसार सुरक्षा परिषदेची निवडणूक 17 जून रोजी होणार आहे. फ्रान्सने याच दिवशी 15 देशांच्या या परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले होते. आशिया-पॅसिफिक खंडात 2021-22 च्या कार्यकाळासाठी भारत या अस्थायी जागांसाठी उमेदवार आहे. भारताचा विजय निश्चित आहे, कारण या खंडात भारत एकमेव जागेवर एकटाच दावेदार आहे.

भारताच्या उमेदवारीला चीन आणि पाकिस्तानसह 55 देशांच्या आशिया-पॅसिफिक समुहाने मागच्या वर्षी जूनमध्ये सर्वसंमतीने समर्थन दिले होते. महासभेने मागच्या आठवड्यात कोरोना महामारीच्या प्रतिबंधाचा विचार करून नव्या मतदान व्यवस्थेंतर्गत सुरक्षा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मतदानाच्या पद्धतीत कोणताही बदल भारताच्या शक्यतांवर जास्त प्रभाव टाकू शकणार नाही. कारण आशिया-पॅसिफिक प्रदेशातून तो एकमेव उमेदवार आहे आणि याचा कार्यकाळ जानेवारी 2021 पासून सुरू होईल.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची निवडणूक महासभेच्या हॉलमध्ये होते. यावेळी सर्व 193 सदस्य गुप्त बॅलेटद्वारे आपला मताधिकार बजावतात. कोविड-19 मुळे जागतिक संघटनेच्या मुख्यालयात जूनच्या अखेरपर्यंतच्या सभा रद्द करणत आल्या आहेत.

नव्या व्यवस्थेअंतर्गत महासभेचे अध्यक्ष तिज्जानी मुहम्मद बंदे सर्व सदस्य देशांना एक पत्र लिहितील. हे पत्र पहिल्या राऊंडसाठी गुप्त बॅलेट मतदानातून कमीतकमी दहा कार्यालयीन दिवसांपूर्वी लिहिले जाईल, ज्यामध्ये सदस्यांना निवडणुकीची तारीख, रिक्त जागांची संख्या, मतदान स्थळ आणि येण्या-जाण्याची सुविधा याबाबत विस्तृत माहिती दिली जाईल.

कॅनडा, आयर्लंड आणि नॉर्वे, पश्चिम यूरोप तथा अन्य देशांच्या श्रेणीत दोन जागांसाठी दावेदारी आहे. दुसरीकडे लॅटीन अमेरिका तथा कॅरेबियन देश श्रेणीमधून मेक्सिको एकमेव उमेदवार आहे. केनिया आणि जिबुझी अफ्रिकन गटातून मैदानात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like