बॉलिवूड भीतीपोटी नरेंद्र मोदींना समर्थन देत आहे : काँग्रेसच्या ‘या’ महिला नेत्याचं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून मिळणारं समर्थन हे भीतीपोटी असल्याचं विधान माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले.

बॉलिवूड अभिनेते राजकीय भाष्य करत असून केंद्र सरकारची बाजू मांडत आहेत, या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून भीतीपोटी समर्थन मिळत आहे. नाहीतर अचानक इतका बदल कसा झाला असता?’

ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक येत आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून खासदार होत्या. या दत्त २००५ मध्ये उत्तर पश्‍चिम मतदारसंघातून व २००९ मध्ये उत्तर मध्य मुंबईमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपचे प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.

Loading...
You might also like