फक्त 2,999 रुपयात ‘खरेदी’ करा ‘स्पोर्ट’ लूक ‘इलेक्ट्रिक’ बाइक, फुल चार्जमध्ये 156 Km

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात नुकतीच आर्टिफिशिअल इंटेलिजेंस लेस इलेक्ट्रिक बाइक लॉन्च झाली आहे. Revolt motors ने दोन इलेक्ट्रिक बाइक एक Revolt RV400 आणि दुसरी Revolt RV300 लॉन्च केली आहे. हे दोन्ही इलेक्ट्रिक बाइक दिसायला एकदम जबरदरस्त आहेत. या बाइककडे तरुण पिढी अधिक आकर्षित होईल.

Revolt RV 300 –
ही बाइक एंट्री लेवल बाइक आहे. ही 65 किमीच्या वेगाने धावू शकते. यात 1.5 KW ची मोटार आणि 2.7kw ची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बाइक 80 ते 150 किमी पर्यंत धावू शकते. सध्या या बाइकवर कंपनीकडून एक धमाकेदार ऑफर देण्यात आली आहे. तुम्ही कंपनीला थेट EMI पेमेंट करु शकतात.

यासाठी कोणतेही डाऊन पेमेंट करावे लागत नाही. त्यानंतर EMI म्हणून तुम्हाला दरमहा 27 महिने 2,999 रुपये द्यावे लागतील. ही बाइक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन देखील विकत घेऊ शकतात.

Revolt RV 400 –
या बाइकमध्ये 3 kw ची मोटार देण्यात आली आहे, तसेच यात 3.24 kw ची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा ही बाइक फुल चार्ज केली की 156 किमी पर्यंत प्रवास करता येईल. या बाइकचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे.

ही बाइक तुम्ही EMI वर घेऊ शकतात, यासाठी 37 महिन्यासाठी तुम्हाला दरमहा 3,499 रुपये द्यावे लागतील. तर दुसऱ्या टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 3,999 रुपये द्यावे लागतील. कमी किंमतीच्या मॉडेलमध्ये आर्टिफिशल एग्जॉस्ट साऊंट सिस्टिम आणि अ‍ॅपच्या माध्यमातून स्टार्ट – स्टॉप फंक्शन ची सुविधा मिळणार नाही.

खासबात –
1. अ‍ॅपच्या माध्यमातून बाइक ट्रक करता येते.
2. अ‍ॅपच्या माध्यमातून बाइक स्टार्ट देखील करता येते.
ही बाइक सध्या लोक दिल्लीतूनच खरेदी करु शकतात. काही महिन्यात याची विक्री देशाभरात होईल.
कंपनीने बॅटरीची 8 वर्षांच्या किंवा 1.5 लाख किलोमीटर पर्यंत वॉरंटी दिली आहे. याशिवाय 3 वर्ष किंवा 30 हजार किमीपर्यंत फ्री मेनटेनेंस कंपनीकडून देण्यात येतो. बाइकवर 5 वर्षापर्यंत 75 हजार किमी पर्यंत वॉरंटी आणि फ्री इंश्योरन्स मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –