लासलगाव : जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याची मागणी

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगांव शहरात गंजलेले वीज खांब आणि रस्त्याच्या मधोमध लटकणार्या विद्युत वाहिन्यांमुळे येथील ग्रामस्थांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. येथील बाजार पेठ व परिसरामध्ये विजेचे खांब जीर्ण झाले असून विद्युत कर्मचारी देखील या पोलवर काम करण्यासाठी घाबरतात. या जीर्ण पोल मुळे ग्रामस्थांचा जीवाला धोका आहे, १९६२ साली सदरचे विद्युत पोल हे लावण्यात आले होते. ५८ वर्ष उलटल्याने पोल जीर्ण झाले आहे. याकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी लक्ष द्यावेे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गाव व बाजारपेठ भागातील लाईट चे पोल गंजलेले व बरेच जुने झालेले आहे. जेव्हा लाईन वर बिघाड होतो. तेव्हा वायरमन सुध्दा पोलवर चढण्यास घाबरतात तरी पोल बदलणे किंवा सदर लाईन आंडरग्राऊन्ड करणे गरजेचे आहे. याच परिसरातून गणपती मिरवणूक व धार्मीक उत्सव मिरवणूक जातात तसेच येथील घरां जवळून सदर लाईन जातात. यामुळे विद्युत वितरण कंपनीने एखादी दुर्घटना होण्यापुर्वी गावात सर्वे करुण जीर्ण आणि गंजलेले विद्युत पोल बदलावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया : मनोज भावसार (सामाजिक कार्यकर्ते) – अनेक वर्षापासूनचे विद्युत पोल असल्याने गंजले असून जीर्ण झाले आहे. महावितरण कंपनीने याकडे वेळीच लक्ष देवून कुठलीही दुर्घटना होण्याअगोदर जीर्ण झालेले पोल बदलावे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/