Electric two-wheeler | अँटी-थेफ्ट फीचरची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये धावते 160 किलोमीटर, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : Electric two-wheeler | देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric two-wheeler) ची मागणी वाढत असल्याने प्रमुख वाहन निर्माता कंपन्यांपासून नवीन स्टार्टअपने सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक लाँच करण्यास सुरूवात केली आहे.

स्कूटचे दोन व्हेरिएंट

ज्यामध्ये नवीन नाव आले आहे ई बाईक गो (eBikeGo) कंपनीचे, ज्यांनी भारतीय बाजारात आपली एक अतिशय वेगळी स्टाईल आणि परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर Rugged लाँच केली आहे.

कंपनीने या स्कूटचे दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत ज्यामध्ये पहिले व्हेरिएंट Rugged G1 आणि दुसरे व्हेरिएंट Rugged G1+ आहे.

किंमत 79,999 रुपये

या स्कूटरचे पहिले व्हेरिएंट Rugged G1 मॉडलची प्रारंभिक किंमत 79,999 रुपये आहे आणि दुसरे व्हेरिएंट Rugged G1+ ची प्रारंभिक किंमत 89,999 रुपये आहे. या दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत केंद्र सरकारद्वारे देण्यात येणारी FAME && सबसिडी जोडलेली आहे.

High Court | रवी राणांविरोधातील कारवाईचे काय झाले? उच्च न्यायालयाकडून EC कडे विचारणा

बुकिंगसाठी 499 रुपये टोकन अमाऊंट

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही स्कूटर खरेदी करता येईल. दोन्ही स्कूटरच्या बुकिंगसाठी कंपनीने 499 रुपयांची टोकन अमाऊंट ठेवली आहे. कंपनीनुसार दोन्ही स्कूटरची डिलिव्हरी 21 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होईल.

कंपनीने स्कूटरमध्ये 2 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक दिले आहे. ज्यासोबत 3 kWh क्षमतेची मोटर लावली आहे.

160 किलोमीटरपर्यंत धावते

स्कूटरची बॅटरी रिप्लेस करू शकता. बॅटरी फुल चार्ज होण्यास 4 तास लागतात. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर स्कूटर 160 किलोमीटरपर्यंत धावते. ज्यामध्ये 75 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड मिळतो. (Electric two-wheeler)

25 पैसे प्रति किलोमीटरपर्यंतच्या खर्च

ही स्कूटर अवघ्या 25 पैसे प्रति किलोमीटरपर्यंतच्या खर्चावर चालते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या दुसर्‍या फीचर्सबाबत बोलायचे तर कंपनीने यामध्ये 50 लीटर क्षमतेचे मोठे स्टोरेज दिले आहे. याशिवाय मोबाइलद्वारे कनेक्ट करता येऊ शकते. ती अ‍ॅपद्वारे चालू-बंद करता येऊ शकते.

12 प्रकारचे सेन्सर

कंपनीने चोरी सारख्या घटना टाळण्यासाठी या स्कूटरमध्ये अँटी-थेफ्ट फीचर सुद्धा लावले आहे, ही या स्कूटरची खासियत आहे.
याशिवाय जे मोबाइल अ‍ॅप या स्कूटरसाठी तयार केले आहे त्यामध्ये कंपनीने वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन 12 प्रकारचे सेन्सर दिले आहेत.

हे देखील वाचा

High Court | वस्त्रांवरूनही ‘स्पर्श’ केल्यास लैंगिक अत्याचार; विधिज्ञांचा न्यायालयात युक्तिवाद

Kaun Banega Crorepati | सावधान ! ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखील पाकिस्तानी हॅकर करताहेत फसवणूक, चुकूनही ‘हा’ नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड करु नका

Pune Crime | पुणे शहरातील 2 अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 41 जणांवर कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Electric two-wheeler | ebikego launched electric scooter rugged gives range of 160 km in single charge know full details from price to features

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update