सरकारची मोठी घोषणा ! पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा ‘स्वस्त’ होणार ‘इलेक्ट्रिक’ वाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारद्वारे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पेट्रोल – डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होतील असे ते म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या किंमतीत 51 टक्क्यांनी घट झाली आहे. टेरी च्या वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट (शाश्वत विकास) या कार्यक्रमात अमिताभ कांत यांची ही माहिती दिली.

किती कमी होणार किंमती –
पेट्रोल – डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्याबॅटरीच्या किंमती घटल्या असून 76 डॉलर प्रति किलोवॅट होतील असा अंदाज आहे. सध्या याची किंमत 156 रुपये युनिट आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायावर सरकार विचार करतंय. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावं यासाठी सरकार प्रत्यत्न करणार आहे.

भविष्यात हायड्रोजनचाही वापर होणार –
देशातील दोन समस्यांवर उपाय काढण्याची गरज आहे. एक शहरीकरण आणि सार्वजनिक परिवहन यांचे स्वरुप निश्चित करण्यावर भर द्यायला हवा असे अमिताभ कांत म्हणाले. शहरातील सीएनजीवर आधारित परिवहन व्यवस्था याशिवाय सार्वजनिक वाहतुकीमध्ये इंधनाच्या रुपात हायड्रोजनच्या वापरावर भर देण्याचाही सरकारचा प्रस्ताव आहे.

इलेक्ट्रिक वाहनं महत्वाची –
टेरीचे संचालक अजय माथुर म्हणाले की रस्ते हे अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्र आहे. त्यामुळे अशा क्षेत्रांना कार्बनमुक्त करण्याची आवश्यकता आहे आणि 100 टक्के हरित विजेवर आधारित वाहनांना प्रोत्साहन देणंही आवश्यक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनं महत्वाची आहेत.