Electricity Amendment Bill | खुशखबर ! आता मोबाइल पोर्टेबिलिटीप्रमाणे बदलू शकता वीज कनेक्शन; कॅबिनेटमध्ये इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल- 2021 लवकरच

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करून एक टेलिकॉम कंपनी सोडून दुसरी निवडता, तसेच आता वीज कनेक्शन सुद्धा बदलू (Electricity Amendment Bill) शकता. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकार इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल, 2021 (Electricity Amendment Bill 2021) कॅबिनेटमध्ये मंजूरीसाठी ठेवू शकते.

या नवीन सुधारित कायद्यानुसार ग्राहक वीज कनेक्शन त्याप्रमाणे बदलू शकतो ज्याप्रमाणे ते मोबाइल कनेक्शन पोर्ट करतात. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे वीज ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल.

13 ऑगस्टपर्यंत पावसाळी अधिवेशन

पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2021 ला समाप्त होईल. लोकसभेच्या 12 जुलै 2021 रोजी जारी बुलेटिननुसार, सरकाने सध्याच्या संसदेच्या अधिवेशनात जी नवीन 17 विधेयके सादर करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये वीज (सुधारित) विधेयकाचा सुद्धा समावेश आहे.

बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, वीज कायद्यात प्रस्तावित दुरूस्तीतून वितरण व्यवसायातून लायसन्सिंग
समाप्त होईल आणि यामध्ये प्रतिस्पर्धा येईल. सोबतच या अंतर्गत प्रत्येक आयोगात कायद्याची
पार्श्वभूमी असलेल्या सदस्याची नियुक्ती आवश्यक असेल. याशिवाय यामध्ये वीज अपीलीय
न्यायाधिकरण (एप्टेल) मजबूत करणे आणि नुतनीकरण खरेदी प्रतिबद्धता (आरपीओ) पूर्ण न
केल्यास दंडाची तरतुद सुद्धा असेल.

सूत्रांनुसार सरकारला पावर सेक्टरमध्ये वेगाने सुधार करायच्या आहेत. यासाठी सरकार हे बिल
लवकरात लवकर अंमलात आणत आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी चौथा
दिवस होता. दोन्ही सदनात जोरदार गोंधळ झाला. या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज 26
जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले.

हे देखील वाचा

Cucumber Farming | फक्त एकदाच 1 लाख गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 8 लाखापर्यंत कमाई; सरकार करेल आर्थिक मदत, जाणून घ्या

Pune Crime | हॉटेल ‘गारवा’चे मालक आखाडेंच्या खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास लातूर येथून अटक, लोणी काळभोर पोलिसांकडून आतापर्यंत 10 जण गजाआड

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Electricity Amendment Bill 2021 | innovation electricity amendment bill 2021 will be introduced in the cabinet electricity connection will be able to change like mobile

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update