धुळेकरांनी केली वीज बिलांची होळी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – महावितरण कंपनीच्या अन्यायकारक धोरणा विरुध्द धुळे येथील औद्योगिक संघटनाच्या, पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्युमाईन क्लब समोरील रस्त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यात शासनाचा निषेध केला गेला.

वाढीव वीज दराच्या विरोधात घोषणा देत मागील वीज दर आयोगाने ठरविल्या प्रमाणेच कायम ठेवावे. त्यासाठी 34,000 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात येऊन अन्य रास्त असलेल्या सात मागण्यांचा विचार करावा त्वरीत मंजूरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. त्यात त्यांना असे सांगण्यात आले, महावितरण आयोगाने निश्चित औद्योगिक वीज दर, शेजारील राज्यातील सर्वात वीज दर इतर राज्याच्या मानाने 20/35 % टक्के दराने जास्त आहे. तसेच शेतकरी, घरगुती, ग्राहकांचे वीज दराने शिखर गाठले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमोडेल हे खरे.

आयोगाने 2018 च्या आदेशानूसार वीज 20651 रुपये पठानी ग्राहकांवर लादलेली आहे. त्यापैकी 6% ग्राहकांकडून व रक्कम उरवर्ती 9% नियम भत्ता आकार म्हणून ग्राहकांकडून वसूल केली जाणर आहे. हि वाढ अन्यायकारक असून तिचा बोजा सामान्य नागरीकांसह व्यापाऱ्यांवर पडणार आहे. विकासाला एक प्रकारे खिळ बसणार आहे. हि पठाणी दर वाढ त्वरीत थांबवावी खान्देश इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोशिएशनचे अध्यक्ष भरत अग्रवाल, सुभाष कांकरीया, नितीन देवरे, महेश नावरकर, अशपाक अन्सारी, श्याम पाटील आदीनी वीज बिल दर वाढ होळी करुन निषेध व्यक्त  केला.