Electricity Bill | ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात, न भरल्यास ‘अंधार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या 31 हजार 555 वीजजोडण्यांच्या वीजबिलाची थकबाकी (Electricity Bill) तब्बल 1 हजार 617 कोटी 31 लाख रुपयांवर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक वीजजोडण्यांची संख्या व थकबाकी (Electricity Bill) ही ग्रामपंचायतींची (gram panchayat) आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी चालू वीजबिलांचा देखील भरणा न केल्यास नियमानुसार पथदिवे (street light) व पाणीपुरवठा योजनांचा (water supply scheme) वीजपुरवठा खंडित (Power outage) करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांचा भरणा करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचांवर देण्यात आली असून त्यात दिरंगाई झाल्यास त्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येणार असल्याचे शासनाकडून लेखी पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांना पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या 42 हजार 29 वीजजोडण्यांचे 32 कोटी 60 लाख रुपयांचे चालू वीजबिल (Current electricity bill) देण्यात आले आहेत. मात्र प्रामुख्याने ग्रामपंचायतींकडून चालू वीजबिलांचा देखील भरणा होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची चालू वीजबिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित (Electricity Bill) करण्याची कारवाई होणार आहे.

जिल्ह्यातील थकबाकी
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामपंचायतींनी पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिले थकविल्याने महावितरणवरील थकबाकीचे ओझे वाढले आहे. पुणे जिल्ह्यात (Pune district) सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 2543 वीजजोडण्यांचे 109 कोटी 80 लाख तर पथदिव्यांच्या 7055 वीजजोडण्यांचे 152 कोटी 32 लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यात (Solapur district) सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 1979 वीजजोडण्यांचे 75 कोटी 44 लाख तर पथदिव्यांच्या 3895 वीजजोडण्यांचे 469 कोटी रुपये थकीत आहे.

सातारा जिल्ह्यात (Satara district) सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 1861 वीजजोडण्यांचे 17 कोटी 59 लाख तर पथदिव्यांच्या 4842 वीजजोडण्यांचे 198 कोटी 13 लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 2642 वीजजोडण्यांचे 88 कोटी 53 लाख तर पथदिव्यांच्या 2874 वीजजोडण्यांचे 71 कोटी 24 लाख रुपये थकीत आहे. तर सांगली जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या 1203 वीजजोडण्यांचे 26 कोटी 69 लाख तर पथदिव्यांच्या 2661 वीजजोडण्यांचे 107 कोटी 63 लाख रुपये थकीत आहे.

 

मुदतीत बिल भरण्याचे निर्देश

राज्यातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत करण्यात आली आहे.
तसेच थकबाकीबाबत निर्णय होईपर्यंत तूर्तास ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांची रक्कम दिलेल्या
मुदतीत महावितरणकडे (MSEDCL) जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार ही चालू वीजबिले भरली न गेल्यास संबंधीत पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येणार आहे.

Web Title :- Electricity Bill | gram panchayats electricity bill arrears crores failure do so will result power outage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Anti Corruption | ‘आयपीएल’ बेटिंगचा धंदा सुरळीत ठेवण्यासाठी 3 लाखाची लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Job Offer Fraud | एका SMS ने मूर्ख बनवले ! काही क्षणात गमावले 3 लाख रुपये; जाणून घ्या अन् व्हा सावध

Pune Mayor Muralidhar Mohol | राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच ‘सुई’चा पुरवठा बंद, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा ‘पलटवार’