Electricity Mobility Promotion Policy | गाडी खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! ‘हे’ सरकार देतंय 3 लाखापर्यंत सबसिडी, जाणून घ्या

0
59
Electricity Mobility Promotion Policy | e vehicle policy goa cm launches electricity mobility promotion policy to promote e vehicle usage see details
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Electricity Mobility Promotion Policy | जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सरकार गाडी खरेदीसाठी 3 लाखाची सबसिडी देत आहे. इलेक्ट्रिक गाडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नवीन पॉलिसी (Electricity Mobility Promotion Policy) सुरू केली आहे. ई-वाहनांच्या (EV) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन पॉलिसी-2021 चा शुभारंभ केला.

 

इलेक्ट्रिक मोबिलिटीला मिळेल प्रोत्साहन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवार म्हणजे आज उद्योग मंत्रालयाद्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित गोलमेजच्या दरम्यान या धोरणाची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले की, या धोरणाचा मुख्य उद्देश बॅटरीवर चालणार्‍या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि राज्याच्या लोकांसाठी रोजगार निर्माण करणे आहे.

ई-वाहनांच्या खरेदीदारांसाठी सबसिडी

मुख्यमंत्र्यांनी म्हटले, ’आम्ही उत्पादनाला प्रोत्साहन देत आहोत. गोव्यात नोंदणीकृत सर्व श्रेणीच्या ई-वाहनांवर पाच वर्षापर्यंत पथकर सूट दिली जात आहे. राज्य सरकार ई-वाहनांच्या खरेदीदारांना सबसिडी सुद्धा देईल आणि चांर्जिंग स्टेशन स्थापन करेल. सावंत यांनी पीटीआयला सांगितले की, राजमार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन असतील. शहरात चार्जिंग स्टेशन राजमार्गांच्या तुलनेत कमी अंतरावर असतील.

 

राज्य सरकार देईल सबसिडी

मुख्यमंत्र्यांनी म्हटले, आमचे धोरण दोन, तीन आणि चारचाकी ई-वाहनांसाठी आहे.
दुचाकी वाहनांसाठी हे 30 टक्के आणि तीनचाकी साठी 40 टक्के आहे.
चारचाकी वाहनांसाठी आम्ही तीन लाख रुपयांपर्यंत सूट देऊ.

 

’अगोदर या-अगोदर मिळवा’ नियम

मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, हा लाभ ‘अगोदर या-अगोदर मिळवा’च्या आधारावर जवळपास 400 वाहनांना दिला जाईल.
या धोरणाने राज्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारे 10,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

 

Web Title :- Electricity Mobility Promotion Policy | e vehicle policy goa cm launches electricity mobility promotion policy to promote e vehicle usage see details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Income Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा 1 जानेवारीनंतर द्यावी लागेल ‘पेनल्टी’

Pune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत; व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून

ACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती

ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती