वीज चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचं ‘स्मार्ट’ पाऊल, होणार ‘कठोर’ कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीजेची होणारी चोरी रोखण्यासाठी आणि २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी मोदी सरकार मोठे नियोजन करण्याच्या तयारी आहे. मोदी सरकार ३ स्तर असलेल्या नियोजनात वीज ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करेल. वीज तारांना जमीनीच्या आतून टाकण्यात येणार आहेत. याशिवाय संपुर्ण देशात आता स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे.

याशिवाय दिवसभरातील वीजेचे दर हे वेगवेगळे असणार आहेत. सकाळी, दुपारी आणि रात्री वीजेचे दर वेगवेगळे असतील.

वीज चोरी रोखण्याचा प्लॅन
वीज कंपन्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी मोदी सरकार नवा प्लॅन आखत आहेत. या प्लॅन अंतर्गत सरकार स्मार्ट मीटर लावणार आहेत आणि योजनेला वेग देणार आहेत. याशिवाय ज्या भागात सर्वात जास्त वीज चोरी होती त्या भागातील माहिती जमा करुन राज्य सरकार तो केंद्र सरकारला देईल. एकूण सरकारचे लक्ष वीज कंपन्याची परिस्थिती सुधारण्यासाठी असणार आहे.

योग्य वीज पुरवठा न झाल्यास रद्द होणार लाइसन्स
आरके सिंह यांनी सांगितले की, जर एखाद्या विभागात जेवढे ग्राहक आहेत आणि त्यांना पुरेल एवढी वीज जर डिस्काम विकत घेत नसेल तर त्यांचे लाइसन्स रद्द करण्यात येईल. तसेच योग्य वेळेत ट्रांसफर लावण्यात आले नाही तर त्यावर दंड लावण्यात येईल आणि ते पैसे ग्राहकांच्या खात्यात टाकण्यात येईल.

सरकारने वीज पुरवठ्याबाबत कठोर होण्यास सुरुवात केली आहे, ते यासाठी की सर्वांना २४ तास वीज पुरवठा व्हावा आणि वीज चोरी रोखली जाऊन वीज कंपन्यांची आर्थिक परिस्थिती सुधारता येईल.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या