जर तुम्ही सुद्धा खराब इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस भंगारात विकत असाल तर व्हा सावध ! होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली : Electronic scrap | जर तुम्ही सुद्धा आपल्या खराब इलेक्ट्रिक डिव्हाईसला सामान्य कचरा समजून तो भंगारवाल्याला विकत असाल तर सावध व्हा. कारण इलेक्ट्रॉनिक स्क्रॅप (Electronic scrap) व्यापारी अवैध प्रकारे हे भंगार चीनला (China) पाठवत आहेत. अशावेळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये असलेला तुमचा डाटा चोरी होण्याची भीती आहे.

बहुतांश लोक आपले खराब मोबाईल, लॅपटॉप इत्यादी कचर्‍यात फेकून देतात किंवा भंगारवाल्याला विकतात. तज्ज्ञांनुसार, या खराब इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये (Electronic device) सुद्धा तुमचा डाटा (Data) सेव्ह राहतो आणि कुणीही तंत्रज्ञान तज्ज्ञ तो डाटा चोरी शकतो.

नुकतेच गाजियाबादच्या लोनीच्या पोलीस आणि क्राईम ब्रँचने मोबाइल टॉवर्सवरून मॉडम आणि नेटवर्क कार्ड चोरी करून चीनला पाठवल्याचे प्रकारण उघडकीस आणले आहे. या प्रकरणात पकडलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितले की, भंगारवाल्यांकडून इलेक्ट्रॉनिक स्क्रॅप अवैध प्रकारे चीनला पाठवले जात आहे.

गंभीर होतेय E-Waste ची समस्या
माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे उत्पादन आणि
वापर होत आहे. ज्यामुळे मोठ्या संख्येने ई-वेस्ट (E-Waste) सुद्धा तयार होत आहे. सरकारी आकड्यांनुसार, जगभरात दरवर्षी 25-50 मेट्रिक टन ई-वेस्ट निर्माण होतो.

इतक्या मोठ्या प्रमाणात ई-कचरा निर्माण झाल्याने पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. कारण
जगातील अनेक देशांत अजूनही ई-कचरा मॅनेजमेंट नाही. यामुळे तिथे पर्यावरणाचे मोठे नुकसान
होत आहे, तसेच डाटा चोरीचा धोका सुद्धा सतत आहे.

इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस विकताना घ्या ही काळजी

– सर्वप्रथम इलेक्टॉनिक डिव्हाईस भंगारवाले किंवा इतरांना विकू नका आणि कचराकुंडीत टाकू नका.
– जर सीपीयू इत्यादी विकत असाल तर हार्डडिस्क तोडून टाका.
– कम्प्यूटर किंवा लॅपटॉपची हार्ड डिस्क, रॅम, मदर बोर्ड काढून नंतर विका.
– मोबाइल फॉरमॅट करून किंवा पूर्णपणे तोडून विका.

हे देखील वाचा

Corona Vaccine | कोरोनाची लस घेतल्यानंतर किती दिवस सेक्स करू नयेः जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Gold Price Today | Gold 8487 नं स्वस्त ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या

Pune Crime Branch Police | बहुचर्चित सेक्स रॅकेट प्रकरणातील फरार नेपाळी शिवा एजंटला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Electronic scrap | your data could be stolen from damage electronic devices who sold in scrap china buying illegal scrap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update