इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विजय असो :राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर ”इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विजय असो,” असे ट्विट करून या निकालाची प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटवरून भाजपच्या यशाला विरोध दर्शवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. त्यात भाजप केंद्रात सत्तेत असल्याने विरोधी पक्षांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला होता.

निवडणुकीनंतर अनेकदा विरोधकांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. ईव्हीएम मशिन्सच्या पारदर्शकतेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. देशाची लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप निवडणूक आयोगावर करण्यात आल्यानंतर आयोगाने ईव्हीएम हॅकिंगचा पुरावा मागितला होता. यानंतरही राजकीय पक्षांचा विरोध कायम राहिला. ईव्हीएमवर सातत्याने उठविण्यात येत असलेले प्रश्न आणि जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी आयोगाने ईव्हीएम हॅकिंग चँलेंजही स्वीकारले होते. परंतु, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राजकीय पक्षांना अथवा नेत्यांना तो सिद्ध करता आला नाही. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये फेरफार केली जाऊ शकते, हे अद्याप पक्षांना सिद्ध करत आले नाही.

दरम्यान ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्हा दौरा चालू केला आहे. या दौऱ्यावर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आले असता त्यांनी कर्नाटकच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ”इलेक्ट्रिक मशीनचा विजय असो,” अशी प्रतिक्रिया कर्नाटकातील निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी दिली आहे.