Video : हत्तीचा तुटला होता एक पाय, त्यांनतरही कमी झाली नाही हिम्मत, पाहून तुम्ही सुध्दा कराल कडक ‘सॅल्यूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा आपण असे व्हिडिओ पाहतो, जे पाहून अंगावर शहारे येतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहून आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो. असाच एक हत्तीचा व्हिडिओ वायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, या हत्तीचा एक पाय तुटलेला आहे, परतु, त्याचा जोश, उत्साह कमी झालेला दिसत नाही.

व्हिडिओत पाहू शकता की, पाय कापल्याने हत्ती कृत्रिम पायाच्या आधाराने चालत आहे. हा व्हिडिओ बॉलिवुडचे प्रसिद्ध डायरेक्टर मधुर भंडारकर यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये हत्तीच्या हिंमतीला ते सलाम करत आहेत. मधुर भंडारकर यांनी शेयर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप पाहिला जात आहे.

व्हिडिओ शेयर करून मधुर भंडारकारने कॅपशनमध्ये लिहिले आहे की, साहस दृढ संकल्पचा पाया आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कृत्रिम पायाच्या आधारे हत्ती हळुहळु महुतासोबत चालत आहे. या व्हिडिओवर ट्विटर यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच वेगाने हा व्हिडिओ शेयर केला जात आहे.