धक्कादायक ! आई-वडिल झोपेत असताना पाण्याच्या बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली असून यामध्ये अवघ्या ११ महिन्याच्या तान्हुल्याचा पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तन्मय दीपक भोये असे या लहान मुलाचे नाव असून तो खेळता खेळता बादलीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. बादलीत पडल्यानंतर त्याचा नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

काल रविवारी दुपारी हि धक्कादायक आणि अतिशय हृदयद्रावक घटना घडली. हा लहान मुलगा ज्या वेळी पाण्यात पडला तेव्हा आईवडील घरात झोपले होते. कुटुंबातील सर्व व्यक्ती दुपारी झोपलेल्या असताना हा लहान मुलगा खेळात खेळत पाण्याच्या बादलीजवळ गेला. तो या बादलीत डोकावून पाहत असताना त्याचा तोल जाऊन पाण्यात पडला आणि नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर जाग आलेल्या आईवडिलांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू केली असून या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त